रेशिमबाग भवनात झाली
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप समन्वय बैठक …..

 रेशिमबाग भवनात झालीराष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप समन्वय बैठक …..

नागपूर दि १५– राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यंदा आपले शताब्दी वर्ष साजरे करणार असून या शताब्दी वर्षात पंच परिवर्तन तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत घर चलो अभियानातून राज्य व केंद्र सरकारच्या योजना जनतेपर्यंत अधिकाधिक कशा पोहोचतील यासंदर्भात चर्चा करण्यासाठी नागपुरात आज रेशिमबाग येथील संघाचा स्मृती भवनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप मध्ये समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या समन्वय बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चन्द्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक आमदार, नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ स्वयंसेवक सहभागी झाले होते. ही बैठक सुमारे साडे चार तास चालली.केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना जनतेपर्यंत अधिकाधिक पोहचण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणे, संघ शताब्दी वर्ष कशाप्रकारे साजरे केले जाणार आहे.
या संदर्भात या बैठकीत चर्चा झाली. याशिवाय युवा संवाद , घर चलो अभियानासह या बैठकीत अनेक विषयावर चर्चा झाली.. ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *