रिझर्व्ह बँक लवकरच बंद करणार २ हजारांच्या नोटा

 रिझर्व्ह बँक लवकरच बंद करणार २ हजारांच्या नोटा

नवी दिल्ली,19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनातून दोन हजार रुपयांच्या नोटा मागे घेण्याची घोषणा केली आहे. मात्र, सध्या बाजारात असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा व्यवहारासाठी वापरता येणार असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत वैध राहणार आहेत. तोपर्यंत ज्यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत, त्यांनी बँकेकडून नोटा बदलून घ्याव्या लागणार आहेत.एका वेळी केवळ 20,000 रुपये मूल्याच्या नोटाच बदलता येतील. बँकांमध्ये 23 मे पासून ही 2000 रुपयांची नोट बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंत नोटा बदलता येणार असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे.

रिझर्व्ह बँक 2000 च्या नोटा चलनातून मागे घेणार आहे, परंतु सध्याच्या नोटा अवैध होणार नाहीत. नोव्हेंबर 2016 मध्ये 2 हजारांची नोट बाजारात आली होती. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 च्या नोटा बंद केल्या होत्या. त्याच्या जागी नवीन पॅटर्नमध्ये 500 आणि 2000 च्या नव्या नोटा जारी करण्यात आल्या होत्या. आरबीआयने 2019 पासून 2000 च्या नोटांची छपाई बंद केली आहे. आरबीआयने बँकांना या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत बदलत राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, संसदेत 1 ऑगस्ट 2022 रोजी दिलेल्या उत्तरात म्हटलं होतं की NCRB डेटानुसार, 2016 ते 2020 दरम्यान देशात जप्त करण्यात आलेल्या 2000 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या 2,272 वरुन 2,44,834 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार 2016 मध्ये देशात 2000 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या 2,272 होती. यामुळेच आता या नोटा चलनातून काढून घेतल्या जात असल्याचे मानले जात आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *