आरक्षण मर्यादा ८० टक्के करा !

 आरक्षण मर्यादा ८० टक्के करा !

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रात सुरू असलेला मराठा विरुद्ध ओबीसी समजाच्या आरक्षणाचा संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. दोन्ही समाजाचे नेते एकमेकांवर टीका करत आहेत. यामुळे दोन समाजातील संघर्ष विकोपाला जात आहे. यामुळे कायदा सुव्यवस्था चिखळत आहे. समाजात व जाती-जातीत वाद होत आहेत . ही परिस्थीती टाळण्यासाठी आरक्षणाची मर्यादा वाढवून ती ८० टक्के करावी अशी मागणी जन संघर्ष समितीचे अध्यक्ष अँड रवींद्र रणसिंग यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.

देशाच्या स्वातंत्र्यानंतर आर्थिक आणि शैक्षणिक मागास असलेल्या वर्गाला आरक्षणाची तरतूद करण्यात आली त्यामुळे त्यांना त्याचा लाभ होऊन त्यांची आर्थिक परिस्थीती सुधारली. सध्या देशात आरक्षणाची मर्यादा ५० टक्के आहे जर ती ८० टक्के केली तर त्याचा लाभ समाजातील इतर गरजू घटकांना होईल व त्यांचा आर्थिक आणि शैक्षणिक दर्जा सुधारण्यास मदत होईल. त्यासाठी मर्यादा वाढवणे गरजेचे आहे असे अँड रवींद्र रणसिंग यांनी यावेळी सांगितले.

आरक्षणामुळे जातीय सलोखा आणि सामाजिक समतोल राहतो त्यामुळे लवकरात लवकर जातीय जनगणाना देखिल करण्यात यावी. तरच देशातील येऊ घातलेली यादवी टळेल. या पार्श्वभूमीवर देशभर जनजागृती करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले. यावेळीसंघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

SW/ML/PGB
30 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *