आरक्षण हे खिरापत वाटण्याचा कार्यक्रम नाही…
जालना, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आरक्षण हे खिरापत वाटण्याचा कार्यक्रम नाही असं म्हणत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला आहे. जरांगे यांना मण्डल आयोग कधी निर्माण झाला माहीत नाही असं म्हणत घटनात्मक अधिकार असलेल्या आयोगाला बोलणे म्हणजे परावरच्या गप्पा आहेत का असा सवाल हाके यांनी जरांगे यांना केलाय. आरक्षण आपल जीवन चांगलं करण्यासाठी उपाय नाहीये, जीवन चांगल करण्यासाठी सरकार अशी प्रतिक्रिया हाके यांनी मराठा आरक्षण बाबत विचारलेल्या प्रश्नावर दिली.
सरकारने ओबीसी समाजाचा बट्ट्या बोळ करून टाकला असल्याची टीका हाके यांनी केली. जरांगे यांनी आरक्षणाचा अभ्यास करावा, आरक्षणासाठी काय करावं लागत, आरक्षणाची गरज काय याबाबत जरांगे यांनी अभ्यास करावा असा सल्ला हाके यांनी त्यांना दिला आहे. आरक्षण हे खिरापत वाटण्याचा कार्यक्रम नाही असे म्हणत 10 टक्के आरक्षण देताना सरकारने केलेलं सर्वेक्षण 100 टक्के बोगस असल्याचा दावा हाके यांनी केलाय. लोकसभा निवडणुकीत जरांगे यांचं वर्तन सगळ्यांनी पाहिलंय असं म्हणत जरांगे यांचा हेतू निवडणुकीचा असू शकतो असं मोठं विधान लक्ष्मण हाके यांनी जालन्यात पत्रकारांशी बोलतांना केले. Reservation is not a program to share…
ML/ML/PGB
23 Jun 2024