आरक्षण मागणी आंदोलन हिंसक , जिल्हा पोलिस अधीक्षक जखमी

नांदेड, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील कृष्नूर येथे आंदोलना दरम्यान पोलिसांवर झालेल्या दगडफेकीत पोलीस अधिक्षकांसह १४ जण जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर पोलीस ॲक्शन मोडवर आले असून दगडफेक प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ४० आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. या दगडफेकीत पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले होते. दरम्यान पोलिसांनी २२ गुन्हे दाखल केले असून ७७ जणांना नोटीस बजावल्या आहेत.
मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहे. रास्ता रोको देखील केले जात आहे. बुधवारी नायगाव तालुक्यातील कृष्नूर येथे नांदेड-हैदराबाद महामार्गावर मराठा आंदोलकांनी रास्ता रोको केला होता. आंदोलना दरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये वाद झाला. त्यानंतर आंदोलकाकडून दगदफेक झाली.
या दगडफेकीत पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे जखमी झाले होते. त्यांच्या हाताला दुखापत झाली. तसेच इतर चार पोलीस अधिकाऱ्यांसह १० पोलीस कर्मचारी देखील जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर कुंटूर पोलिसांनी मंगळवारी रात्री गुन्हा दाखल केल्यानंतर ४० जणांना ताब्यात घेतले आहे. Reservation demand agitation violent, District Superintendent of Police injured
समाज विघातक जाळपोळ, कायद्याचे पालन न करणे, झुंडगिरी करणे यात सर्वांनाच भरडावे लागते. ज्या काही आजवर दंगली झालेल्या आहेत. त्याचे दुष्परिणाम सर्वसामान्यां सहित सर्व समाजांनी भोगलेले आहेत. रोजचे शांततामय जीवन आणि जीवन व्यवहार जर सुरळीत चालवायचे असतील तर रस्त्यावरील समाज विघातक कृत्याचा निषेध केला पाहिजे. सकल मराठा समाजाने आजवर ज्या शांततेने आंदोलन केले त्याला जर कोणी गालबोट लावत असेल तर सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी अशा लोकांना बाजुला करून त्यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. शांतता, कायदा, सुव्यवस्थेला जर कोणी आव्हान देत असेल तर अशा समाजकंटकाविरूद्ध कायदेशीर बडगा आम्ही उगारून कठोर कारवाई करू, असा इशारा विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांनी दिला आहे.
ML/KA/PGB
2 Nov 2023