महारेराच्या आदेशातील वसुलीसाठी विशेष मोहीम
मुंबई दि २६ : राज्यातील घर खरेदीदारांची फसवणूक झाल्यानंतर महारेरा कडून वसुलीचे आदेश जारी होऊनही ती होत नसल्यामुळे त्यासाठी एक विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
याबाबतचा मूळ प्रश्न अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला होता त्यावर नितीन राऊत यांनी उपप्रश्न विचारला. एकूण वसुली आदेशांपैकी २७९ कोटी वसूल झाले आहेत, NELT च्या वादात १०३ कोटी अडकले आहेत, तर ४३० कोटी वसूल होणे बाकी आहेत अशी माहिती देसाई यांनी दिली.
थकीत वसुलीसाठी जबाबदार असणाऱ्या सर्व विकासकांच्या मालमत्ता शोधून काढून त्यावर टाच आणून वसुली मोहीम राबविण्यात यावी अशा सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तसेच विभागीय आयुक्तांना देण्यात आल्या आहेत त्यामुळे सध्या ३४ टक्के असणाऱ्या वसुलीचे प्रमाण वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं ही मंत्र्यांनी सांगितलं.ML/ML/MS