मराठा आरक्षणासाठीचा अहवाल सरकारला सादर

नागपूर, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील मराठा- कुणबी, कुणबी -मराठा जातीच्या नोंदीसाठी आवश्यक पुराव्यांची तपासणी करण्यासाठी आणि प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी नेमलेल्या न्या संदीप शिंदे ( निवृत्त) समितीने तयार केलेला दुसरा अहवाल आज न्या शिंदे यांनी आज विधिमंडळ प्रांगणातील कक्षात राज्य शासनास सादर केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा अहवाल सुपूर्द करण्यात आला. यावेळी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपस्मितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश महाजन, दादाजी भुसे, शंभूराज देसाई उपस्थित होते. यापूर्वी न्या शिंदे समितीचा पहिला अहवाल 31 ऑक्टोबर रोजी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारण्यात आला होता. Report for Maratha reservation submitted to Govt
ML/KA/PGB
18 Dec 2023