सलग तिसऱ्यांदा Repo Rate स्थिर

 सलग तिसऱ्यांदा Repo Rate स्थिर

मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय रिझर्व्ह बँकेने सलग तिसऱ्यांदा रेपो दर कायम म्हणजेच ६.५ टक्क्यांवर ठेवत कर्जदारांना दिलासा दिला आहे. यापूर्वी एप्रिल आणि जूनमध्ये झालेल्या चलन विषयक धोरण समितीच्या बैठकीत रेपो दर स्थिर ठेवण्यात आला होता.
भारतीय रिझर्व्ह बँके (RBI)च्या चलनविषयक धोरण समिती (MPC)मध्ये घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज नवीन पतधोरण जाहीर केले. ८ ते १० ऑगस्टदरम्यान झालेल्या चलन विषयक धोरण समितीच्या बैठकीत या महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी या आर्थिक वर्षासाठी किरकोळ चलनवाढीचा अंदाज वाढवला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे पुढील काही तिमाहींमध्ये रेपो दर कमी होण्याची आशा नाही. या वर्षाच्या अखेरीस रिटेल चलनवाढीचा दर आरबीआयच्या उद्दिष्टापर्यंत आला तर केंद्रीय बँक पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीपूर्वी रेपो दर कमी करणार नाही. याचा अर्थ तोपर्यंत तुमचा EMI सध्याच्या पातळीवर राहण्याची शक्यता आहे.

RBI ने फेब्रुवारी २०२३ मध्ये रेपो दरात शेवटचा बदल केला होता. फेब्रुवारीमध्ये चलन विषयक धोरण समितीने रेपो दरात ०.२५ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. फेब्रुवारीमधील रेपो दरातील या बदलासह मे २०२२ ते फेब्रुवारी २०२३ पर्यंत रेपो दरात २५० बेसिस पॉईंट्स म्हणजेच २.५ टक्के वाढ करण्यात आली आहे. गेल्या पाच-सहा तिमाहीत रेपो दरात झालेल्या वाढीमुळे गृहकर्ज घेणारे प्रचंड नाराज आहेत. गे

गेल्या वर्षी मे महिन्यापासून रेपो दरात २.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांच्या गृहकर्जाचा ईएमआय वाढला आहे. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी मध्यवर्ती बँकेने रेपो दरात वाढ केली होती. आता महागाई उच्च पातळीवरून खाली आली आहे. परंतु ती ४ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यासाठी आपले प्रयत्न सुरूच ठेवणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

ML/KA/SL

10 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *