लोकसभेतील घटनेचे पडसाद महाराष्ट्राच्या विधिमंडळात

 लोकसभेतील घटनेचे पडसाद महाराष्ट्राच्या विधिमंडळात

नागपूर, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभेतील गॅलरीतून सभागृहात उड्या मारत गोंधळ घालण्यात आल्याच्या घटनेचे पडसाद महाराष्ट्राच्या विधिमंडळात देखील उमटले, विधान परिषदेच्या गॅलरीत या अधिवेशनात अभ्यागतांना प्रवेश देऊ नये असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत.

दरम्यान ही घटना समोर आल्यानंतर सभागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेचा तत्काळ आढावा घेण्यात आला. तसेच उपस्थित सुरक्षा रक्षकांना कडेकोट तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही घटना गंभीर आहे. असेही उपसभापती यांनी यावेळी सांगितले. विधानपरिषदेतील गॅलरी पासेस आजपासून बंद करण्यात येत आहेत.

अभ्यागतांना सभागृह गॅलरीत प्रवेश मिळणार नाही. आमदारांनी पासेसबाबत पत्र जारी करू नये असे निर्देश उपसभापतींनी दिले.

ML/KA/SL

13 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *