सुप्रसिद्ध लेखक क्षितीज पटवर्धनचे दिग्दर्शनात पदार्पण
मुंबई, दि. 3 : फास्टर फेणे, डबलसीट, बालक-पालक, सिंघम अगेन अशा विविध चित्रपटांचे लेखक क्षितिज पटवर्धन आता दिग्दर्शन म्हणून पदर्पण करत आहे. उत्तर हा आई मुलाच्या नात्यांची आजच्या परिभाषेतील गोष्ट सांगणारा त्यांचा चित्रपट १२ नोव्हेंबर ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री रेणूका शहाणे यात आईची भूमिका करणार आहेत तर अभिनय बेर्डे मुलाची भूमिका करणार आहे. ऋता दुर्गुळेने देखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका केली आहे. या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला.
झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणाले, “उत्तर चित्रपटाची गोष्ट क्षितिजने ऐकवली तेव्हाच त्या विषयाची ताकद आमच्या लक्षात आली होती. आई आणि मुलाच्य नात्यावर भाष्य करणारी, ही आजच्या पिढीची गोष्ट प्रत्येक प्रेक्षकाला भावणारी आहे. हा चित्रपट मराठी भाषेतला असला तरी यातील भावना ही वैश्विक आहे आणि ती प्रत्येकाला आपलीशी वाटावी अशीच आहे.”
झी स्टुडिओजचे उमेशकुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर व जॅकपॉट एंटरटेनमेंटवे मयूर हरदास आणि संपदा वाघ यांनी या वित्रपटाची निर्मिती केली असून येत्या १२ डिसेंबरला झी स्टुडिओजच्या माध्यमातून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
SL/ML/SL