प्रसिद्ध उर्दु शायर मुनव्वर राणा यांचे निधन

 प्रसिद्ध उर्दु शायर मुनव्वर राणा यांचे निधन

लखनौ, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

प्रसिद्ध शायर आणि कवी मुन्नवर राणा यांचं लखनऊ या ठिकाणी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. प्रकृती बिघडल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. रविवारी रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला. मुन्नवर राणा यांच्यामागे त्यांची पत्नी, चार मुली आणि एक मुलगा असं कुटुंब आहे. मुन्नवर राणा हे प्रसिद्ध शायर आणि कवी होते. उर्दू, हिंदी आणि अवधी भाषांमध्ये ते लिखाण करत असत.

त्यांच्या या शैलीतल्या खास गझल आजही लोकांच्या स्मरणात आहेत. उर्दू साहित्यातल्या योगदानासाठी २०१४ मध्ये त्यांना साहित्य अकदामी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. तसंच २०१२ मध्ये त्यांना माटी रतन सन्मान देऊनही गौरवण्यात आलं होतं. २०१५ मध्ये त्यांनी देशातल्या असहिष्णुतेचा मुद्दा मांडून साहित्य अकदामी पुरस्कार परत केला होता. एवढंच नाही तर यानंतर आपण कुठलाही सरकारी पुरस्कार स्वीकारणार नाही अशीही प्रतिज्ञा त्यांनी केली होती.
मुन्नवर राणा यांना बंडखोर शायर म्हणून ओळखलं जात होतं. २०२२ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक होण्याआधी मुन्नवर राणा म्हणाले होते की योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाले तर मी उत्तर प्रदेशात राहणार नाही. या सरकारच्या मनात आलं तर मुस्लिमांना राज्य सोडायला लावतील असंही मुन्नवर राणा म्हणाले होते. २०२० मध्ये एका व्यंगचित्रावरुन वाद झाला आणि फ्रान्समध्ये एका शिक्षकाची हत्या झाली. ही कृती योग्य असल्याचंही राणा म्हणाले होते.

राणा यांच्या काही लोकप्रिय शायरी

“किसी को घर मिला हिस्से में, किसी के हिस्से में दुकान आई, मैं घर में सबसे छोटा था, मेरे हिस्से में मां आई…”

“अभी ज़िंदा है माँ मेरी मुझे कुछ भी नहीं होगा, मैं घर से जब निकलता हूँ दुआ भी साथ चलती है!”

“इस तरह मेरे गुनाहों को वो धो देती है मां बहुत गुस्से में होती है तो रो देती है”

“जिस्म पर मिट्टी मलेंगे पाक हो जायेंगे हम एै ज़मीं एक दिन तेरी ख़ूराक हो जायेंगे हम”

“हमसे मोहबत करने वाले रोते ही रह जाएंगे हम जो किसी दिन सोए ,तो सोते ही रह जाएंगे”

“हम नहीं थे तो क्या कमी थी यहाँ ,हम न होंगे तो क्या कमी होगी”

“सरफिरे लोग हमें दुश्मन-ए-जाँ कहते हैं,हम जो इस मुल्क की मिट्टी को भी माँ कहते हैं !”

SL/KA/SL

15 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *