प्रख्यात गझल गायक पंकज उधास यांचे निधन
मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दर्दभऱ्या गझल गायकीने भारतीय कानसेनांना तृप्त करणारे ज्येष्ठ गायक पंकज उधास (Pankaj Udhas) यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून पंकज उधास हे आजारी होते. आज मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ७२ व्या वर्षी पंकज उधास यांनी अखेरचा श्वास घेतला. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या मुलीने ही माहिती दिली. पंकज उधास यांच्या निधनाने संगीत जगतावर शोककळा पसरली आहे. पंकज उदास यांनी गायलेली अनेक गाणी, गझल आजही संगीतप्रेमींच्या ओठांवर आहेत. त्यांच्या या निधनावर चित्रपटसृष्टी आणि संगीत क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
उधास यांनी 50 हून अधिक अल्बम आणि ‘चिट्ठी आई है’ आणि ‘जिए तो जिए कैसे’ यासह काही सदाबहार चित्रपट गाणी गात प्रेक्षांच्या मनात कायमचं घर केलं. चिठ्ठी आयी है नावाच्या गझल पासून मोठी (padmashri pankaj udhas) लोकप्रियता मिळाली होती. १९८६ मध्ये प्रदर्शित झालेल्या नाम मधील त्या गझलनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. इतक्या वर्षांनी देखील ती गझल कमालीची लोकप्रिय असल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर दिल्लगी, फिर तेरी कहानी याद आई, चले तो कट ही जाएगहा आणि तेरे बिन नावाच्या गझलला प्रेक्षकांची लोकप्रियता मिळाली होती.
पंकज उधास यांचा जन्म १७ मे १९५१ या दिवशी गुजरातमध्ये झाला होता. १९८० ते १९९० च्या दशका ते भारतातील सर्वात लोकप्रिय गझल गायक बनले. त्यांनी त्यांच्या मृदू आवाजाने भारतीयांचे मन जिंकले होते. भारतातच नाही तर परदेशात देखील त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. पंकज उधास यांनी त्यांच्या संगीत विश्वातील करिअरची सुरुवात वयाच्या सहाव्या वर्षापासून केली होती. त्यांच्या घरातच त्यांना गाण्याचे संस्कार लाभले. कॅसेटचा काळ असतानाचा सुपरहिट गायक अशी पंकज उधास यांची ओळख होती. ‘ना कजरे की धार’, ‘आज फिर तुमपे प्यार आया है..’ ‘जिये तो जिये कैसे’, ‘और आहिस्ता’ अशी त्यांची असंख्य गाणी आजही रसिकांच्या ह्रदयाचा ठाव घेतात.
SL/KA/SL
26 Feb. 2024