Renault ने लाँच केली इलेक्ट्रिक बाईक

 Renault ने लाँच केली इलेक्ट्रिक बाईक

मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इलेक्ट्रीक बाईक्सना तरुणांचा मोठा प्रतिसाद लाभत असताना विविध आंतरराष्ट्रीय कंपन्या अत्याधुनिक इ-बाईक बाजारात दाखल करत आहेत. Renault कंपनीने ऑफ-रोड-ओरिएंटेड डिझाइन केलेली इलेक्ट्रिक बाईक हेरिटेज स्पिरिट स्क्रॅम्बलर देखील लाँच केली आहे. हे मॉडेल 2024 पॅरिस मोटर शोमध्ये 4 ई-टेक इलेक्ट्रिक कारसह लाँच करण्यात आले होते. हेरिटेज स्पिरिट स्क्रॅम्बलरमध्ये 4.8 kWh बॅटरी पॅक आहे. जे 10 bhp चा पॉवर आणि 280 Nm टॉर्क देते. कंपनीचा दावा आहे की ही बाईक एका चार्जवर 110 किलोमीटरची रेंज देते. ही बाईक दैनंदिन वापरासाठी बनवण्यात आली आहे.

Renault ने पॅरिस मोटर शोमध्ये नवीन Renault 4 E-Tech इलेक्ट्रिक कारचे अनावरण केले. यासोबतच कंपनीने हेरिटेज स्पिरिट स्क्रॅम्बलर ही इलेक्ट्रिक बाइक सादर केली. त्याची किंमत EUR 23,340 (सुमारे 21.2 लाख रुपये) आहे. त्याची रचना स्पोर्टी आहे. यात एलईडी डीआरएलसह एक लहान एलईडी हेडलाइट युनिट आहे. याशिवाय सिंगल-पीस रिब्ड डिझाईनचे अस्सल लेदर सीट यात दिसत आहे. यात राउंडेड मिरर आहे. याशिवाय यात सीटच्या खाली एक नवीन हँडलबार, इंधन टाकी आणि बॅटरी पॅक देण्यात आला आहे. या बाईकची डिझाइन अशा प्रकारे करण्यात आली आहे की ती ऑफ-रोडवर चालवताना कोणतीही गैरसोय होणार नाही.

SL/ML/SL

20 Oct. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *