उपसभापतीना पदावरून दूर करा,राज्यपालांकडे मागणी

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क ) : विधानरिषदेतील उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना ठाकरे गटाचा राजीनामा दिला आहे, त्यांना पक्षाने निलंबित केले आहे त्यामुळे त्यांना त्यांच्या पदावरून दूर करावे अशी मागणी विरोधी पक्षाच्या वतीने आज राज्यपालांकडे करण्यात आली आहे, दुसरीकडे त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव ही दाखल करण्यात आला आहे.
आज विधानरिषदेत त्यांना पदावर बसण्याचा अधिकार नाही असा मुद्दा उपस्थित झाला होता, त्यावर अशी असंवैधानिक मागणी करता येणार नाही अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली, त्यानंतर हा विषय बंद झाला होता.
त्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात झाली. यावेळी थेट राज्यपालांकडे जाऊन दाद मागण्याचा निर्णय झाला , त्याचवेळी विधिमंडळ सचिवांकडे डॉ गोऱ्हे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे डॉ गोऱ्हे यांना त्वरित पदावरून दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ML/KA/SL
17 July 2023