सावरकरांच्या जगप्रसिद्ध उडीचे भगूर येथे स्मरण

नाशिक, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भगूर येथील भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समुहाच्या वतीने स्वा.सावरकरांनी फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरात जहाजातून मारलेल्या साहसी उडीला ११३ वर्ष झाल्या बद्दल विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.Remembering Savarkar’s world famous jump at Bhagur
समुहाच्या वतीने सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस संभाजी देशमुख यांनी तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मूर्तीस आकाश नेहेरे यांनी पुष्पहार अर्पण करून वंदन केले, त्यानंतर सावरकर स्मारकात योगेश बुरके व सुनील जोरे यांनी सावरकरांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण केला. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जयघोष करण्यात आला, याप्रसंगी स्वातंत्र्य सावरकरांच्या जग प्रसिद्ध उडी बाबतची पार्श्वभूमी व तत्कालीन परिस्थितीवर आधारित मंजिरी मराठे यांच्या लेखाचे वाचन मंगेश मरकड आणि शिरीष पाठक यांनी केले. तसेच नुकत्याच झालेल्या आषाढी एकादशीच्या दिवशी वारकरी वेशभूषा स्पर्धा घेण्यात आलेली होती, त्या स्पर्धेतील राया टिळे, दुर्वांश बोराडे, शिव गीते ,अद्विक गायकर, पार्थ शीदगुडे या पाच स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी विजेते स्पर्धक व त्यांचे पालक तसेच महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
ML/KA/PGB
9 July 2023