वाढीव मुदतीत TET उत्तीर्ण शिक्षकांना न्यायालयाकडून दिलासा
नवी दिल्ली, दि. १० : शिक्षकांना नियुक्तीच्या वेळी TET प्रमाणपत्र नसले तरी सेवेतून काढता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. RTI कायद्यानुसार वाढीव मुदतीत टीईटी उत्तीर्ण केलेल्या शिक्षकांना हा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी.आर. गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने हा ऐतिहासिक निर्णय दिला. वाढीव मुदत ३१ मार्च २०१९ पर्यंत होती. या मुदतीपूर्वी टीईटी परीक्षा उत्तीर्ण केलेल्या शिक्षकांना केवळ नियुक्तीच्या वेळी प्रमाणपत्र नव्हते म्हणून सेवेतून काढणे चुकीचे आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
कानपूर नगर येथील दोन सहाय्यक शिक्षकांना २०१२ मध्ये नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी वाढीव मुदतीपूर्वी, म्हणजेच २०१४ पर्यंत TET परीक्षा उत्तीर्ण केली होती. मात्र, नियुक्तीच्या वेळी त्यांच्याकडे टीईटी प्रमाणपत्र नव्हते. याच कारणास्तव जुलै २०१८ मध्ये त्यांना सेवेतून काढून टाकण्यात आले होते. या शिक्षकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अलाहाबाद उच्च न्यायालयाने सेवा समाप्तीचा निर्णय कायम ठेवला होता. त्यानंतर या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.
SL/ML/SL