इथे होत आहे रिलायन्सची जागतिक दर्जाची ग्रीन फिल्ड स्मार्ट सिटी

 इथे होत आहे रिलायन्सची जागतिक दर्जाची ग्रीन फिल्ड स्मार्ट सिटी

मुंबई, दि.१४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंपनी आता जागतीक दर्जाची स्मार्ट ग्रीन सिटी उभारत आहे. तब्बल ८ हजार एकराच्या परिसरात ही अद्ययावत सिटी निर्माण होत आहे. दिल्ली जवळच्या गुरुग्राम येथे स्पार्ट सिटी उभारणीचे काम सुरू आहे.

या अत्याधुनिक शहराला मॉडेल इकॉनॉमीक टाऊनशिप लिमिटेड (मेट सिटी) असे नाव देण्यात आले आहे. ४ जपानी कंपन्या या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. हरयाणातील झज्जर जिल्ह्यात ८ हजार एकर वर होणाऱ्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील १ हजार ९०० एकरवर शहर वसवण्यास कायदेशीर मान्यता मिळाली आहे.

स्मार्ट सिटी उभारणासाठी पायाभूत सुविधांवर अद्याप ८ हजार कोटींहून अधिक रुपये गुंतवणूत झाली आहे. यामध्ये ५ औद्योगिक क्षेत्रांचा समावेश असून 2 विशेष आर्थिक क्षेत्रांचा समावेश आहे. येथे आत्तापर्यंत २५ हजारांहून अधिक रोजगार निर्माण झाले आहेत.

दिल्ली, गुरुग्राम, नोएडा सह परिसरातील अन्य महत्त्वाच्या शहरांशी या स्मार्ट सिटी उत्तम कनेक्टीव्हीटी आहे. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्ली मुंबई कॉरिडॉर देखील या स्मार्ट सिटीच्या जवळच वसले आहेत.
SL/KA/SL
14 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *