Reliance चे Jio-Coin डिजिटल चलन

 Reliance चे Jio-Coin डिजिटल चलन

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या सर्वत्र जिओ क्वाईनची चर्चा सुरु आहे. मागील काही दिवसांपासून रिलायन्स जिओ क्वाईन ‘हॉट टॉपिक’ बनला आहे. काही तज्ज्ञांकडून एक टोकनची किंमत 0.50 डॉलर (जवळपास 43.30 रुपये) असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिओ क्वाईन हे डिजिटल चलन आहे. इथरियम किंवा बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सीऐवजी रिलायन्स जिओचे हे नाणे रिवॉर्ड टोकन किंवा डिजिटल लॉयल्टी पॉइंटसारखे आहे.

पॉलीगॉन ब्लॉकचेनवर तयार केलेले हे नाणे जिओची सेवा देणाऱ्या अ‍ॅप्समध्ये वापरले जाऊ शकते. तसेच जिओ अ‍ॅप्सवर खरेदी करून नाणे मिळवता येईल. जिओ कॉइन्स गेम चेंजर ठरू शकतात कारण तुम्ही ही नाणी जिओ अ‍ॅप्समध्ये डिस्काउंटसाठी वापरू शकता. जिओ क्वाईन रिलायन्स पेट्रोल पंप आणि जिओ मार्ट या सारख्या लोकप्रिय सेवांसारख्या रिलायन्स जिओच्या मोठ्या इकोसिस्टममध्ये कशा पद्धतीने वापरता येणार आहे.

जिओ क्वाईन मिळवण्यासाठी तुमच्या फोनमध्ये JioSphere अ‍ॅप इंस्टॉल करा, हे ॲप Android आणि Apple वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. अ‍ॅप इन्स्टॉल झाल्यानंतर त्यावर खाते तयार करावे लागेल. त्यानंतर जसा तुम्ही वापर कराल हळूहळू रिवॉर्ड म्हणून नाणी मिळू लागतील.

SL/ML/SL
17 Feb. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *