भारतातील 500 सर्वात शक्तिशाली कंपन्यांमध्ये रिलायन्स अग्रेसर

हुरुन इंडिया या संस्थेने भारतातील 500 शक्तिशाली कंपन्यांची यादी जाहीर केली आहे. त्यात पुन्हा एकदा रिलायन्स इंडस्ट्रीजने बाजी मारली आहे. रिलायन्स कंपनी ही कंपनी केवळ सर्वाधिक कमाई करणारी कंपनी असली तरीही सर्वाधिक नफा कमावणारी कंपनी म्हणूनही तिने स्थान मिळवले आहे. तसेच, दुसरा क्रमांक TCS ने पटकावला आहे. विशेष म्हणजे, भारताच्या या 500 टॉप कंपन्यांचे एकूण मूल्य (3.8 ट्रिलियन डॉलर्स) भारताच्या GDP पेक्षाही जास्त आहे. तसेच, टॉप 10 कंपन्यांचे एकूण मूल्य हे सौदी अरेबियाच्या GDP पेक्षाही (1.7 लाख कोटी डॉलर्स) जास्त आहे.