Reliance Entertainment आणि Disney चे विलिनीकरण पूर्ण
डिस्ने आणि रिलायन्स एंटरटेनमेंट यांचे विलीनीकरण झाले आहे. दोन्ही कंपन्यांनी आज म्हणजेच 14 नोव्हेंबर रोजी विलीनीकरण पूर्ण झाल्याची घोषणा केली. आता भारतातील सर्वात मोठी करमणूक कंपनी असण्यासोबतच ती एक स्पोर्ट्स पॉवरहाऊस देखील आहे.
स्पर्धा आयोग आणि इतर नियामक प्राधिकरणांच्या मंजुरीनंतर, रिलायन्सची उपकंपनी व्हायाकॉम-18 आणि डिस्ने इंडियाचे विलीनीकरण प्रभावी झाले आहे. या संयुक्त उपक्रमासाठी रिलायन्सने 11,500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की हा करार पोस्ट मनी आधारावर 70,352 कोटी रुपयांमध्ये पूर्ण झाला आहे. विलीनीकरणानंतर स्थापन झालेल्या कंपनीत रिलायन्सचा 63.16% आणि डिस्नेचा 36.84% हिस्सा असेल. नीता अंबानी यांच्या अध्यक्षा असतील.