प्रविण मोरे व चंद्रमणी जाधव लिखित ‘सहवासातले आठवले’ पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन

 प्रविण मोरे व चंद्रमणी जाधव लिखित ‘सहवासातले आठवले’ पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन

मुंबई दि.27(एम एमसी न्यूज नेटवर्क) : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांचे विश्वासू स्वीय सहायक प्रविण मोरे आणि चंद्रमणी जाधव यांनी ना.आठवले यांच्या विविध पैलूंवर, त्यांच्या व्यक्तीमत्वावर ,ना.आठवले यांच्या सहवासातून आलेले अनुभव ” सहवासातले आठवले”पुस्तक प्रकाशन पुस्तकरुपी लेखन‌ संपादन‌ प्रविण मोरे व चंद्रमणी जाधव यांनी केले‌ आहे.या पुस्तकरुपी ग्रंथाचे प्रकाशन येत्या शनिवारी 29 जून 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता मुंबई येथील नेहरु सेंटर’, ॲाडीटोरिअम, गोल बिंल्डिग, वरळी, मुंबई येथे होणार आहे.

या पुस्तक प्रकाशनाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत तर माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे,अन्न व पुरवठा मंत्री ना छगनराव‌ भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री ना दिपक केसरकर,क्रिडा मंत्री ना.संजय बनसोडे, आ.जयंत पाटील, आ.प्रविण दरेकर, उबाठाचे‌ माजी आ.अनिल‌ परब,माजी आ.अविनाश‌ महातेकर,आरपीआय प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, महाराष्ट्राचे सरचिटणीस गौतमभाऊ सोनवणे, मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, जेष्ठ संपादक राजीव खांडेकर,साहित्यिक शरणकुमार लिंबाळे,उद्योजक मंदार‌ भारदे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहे.तरी या पुस्तक प्रकाशनाला आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहावे असे आवाहन प्रविण मोरे यांनी केले आहे.

SW/ML/SL

27 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *