दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी रेखा गुप्ता यांनी घेतली शपथ

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर मुख्यंमत्री पदाकडे लोकांचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्रिपदासाठी प्रवेश वर्मा, विजेंद्र गुप्ता, सतीश उपाध्याय, पवन शर्मा, आशिष सूद, रेखा गुप्ता, शिखा राय, रवींद्र इंद्रराज सिंह आणि कैलाश गंगवाल यांच्या नावांची चर्चा सुरू होती. पण अखेर भाजपकडून दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर गुरूवारी दिल्लीच्या रामलीला मैदानावर रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे रेखा गुप्ता दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत. तसेच, परवेश वर्मा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन आपला कार्यभार स्वीकारला.