गणेशोत्सवानिमित्त शासनाची रील बनवा स्पर्धा, 1 लाखांपर्यंतचे रोख बक्षीस
मुंबई, दि. २८ : या वर्षीपासून महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सव हा राज्य उत्सव म्हणून जाहीर केला आहे. गणेशोत्सवानिमित्त शासनाने रील बनवण्याची एक अनोखी स्पर्धा जाहीर केली आहे, ज्यात विजेत्याला 1 लाख रुपयांपर्यंतचे रोख बक्षीस मिळू शकते.
जर तुम्हाला रील्स बनवायला आवडत असेल, तर तुमच्यासाठी एक खास संधी आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगमंच आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेचा मुख्य उद्देश गणेशोत्सवाचा (Ganeshotsav 2025) उत्साह केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न ठेवता, देशभरातील आणि परदेशातील लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे