रिल बनवणे बेतले जीवावर, 300 फूट खोल दरीत कोसळून रिल स्टारचा मृत्यू
मुंबई येथील रिल स्टार आनवी कामदार ही आपल्या मित्र मैत्रिणींसोबत 16 जुलै रोजी कुंभे येथील जीवघेण्या कड्यावर इंस्टाग्राम रील बनवण्यासाठी आली होती. परंतु तिचा हा रील दुर्दैवाने तिच्या जीवावर बेतून तिच्या जीवनाचा शेवटचा प्रवास ठरला आहे. माणगावमध्ये 300 फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाला आहे. व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट आणि प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर असलेल्या तरूणीचा रिल बनवण्याच्या नादात जीव गेला आहे. कड्याच्या टोकावरील अरुंद आणि निसरड्या रस्त्यावरून जात असताना तिचा पाय घसरून ती 300 फूट खोल दरीत पडली. तिच्या सोबत असलेल्या मित्र मैत्रिणींनी ही माहिती माणगांव पोलीस स्थानकात दिली. माणगांवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत जवळच्या सर्व बचाव पथकांना बोलावले.
कुंभे ग्रामपंचायत सरपंच आणि काही सदस्य, ग्रामपंचायतचे कर्माचारी देखील तातडीने घटनास्थळी पोहोचले. महावितरणचे कर्मचारी देखील बचाव कार्यासाठी पुढे सरसावत बचाव पथके येण्यापूर्वी खोल दरीचा घेत आढावा घेत होते. विळे येथील शेलार मामा रेस्क्यू टीम तातडीने तेथे पोहोचली. परंतु पाऊस आणि अतिशय धुके असल्यामुळे आणि अपुऱ्या उपकरणांमुळे काहीच करणे शक्य होत नव्हते. तिला दरीतून बाहेर काढताना तिचा श्वास चालू होता. पण हॉस्पिटमध्ये पोहोचण्यापूर्वीच तिचे निधन झाले.