या देशात लाल लिपस्टीकवर बंदी
मुंबई,दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजच्या उदारीकरणाच्या काळातही जगातील काही देश अजूनही हुकुमशाही राजवटीचा सामना करत आहेत. हुकुमशहा आपल्या मर्जीला येईल त्या प्रमाणे प्रजेवर नियम लादतात. अनेकदा या हुकुमशहांची पहिली दडपशाही देशातील स्त्रियांवर विविध बंधने लावते. उत्तर कोरियामध्ये सध्या याचा प्रत्यय येत आहे.
उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन हा नागरीकांवर विचित्र बंधने आणि नियम लादत असतो. आता त्याने देशातील स्त्रियांनी लाल लिपस्टीक लावू नये असा नियम केला आहे. लाल रंग भांडवलशाही आणि व्यक्तीस्वातंत्र्यवादाचे प्रतिक मानला जातो. यामुळे उत्तर कोरियामध्ये लाल लिपस्टीकच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
या नियमाचे नीट पालन होत आहे ना हे पाहण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. ही पेट्रोलिंग टिम दररोज महीलांचा मेकअप तपासते. तसेच महिलांच्या पर्सची देखील तपासणी केली जाते. रेड लिपस्टीक आढळल्यास स्त्रियांना जबर दंड केला जातो.
त्याचबरोबर उत्तर कोरियामध्ये स्त्रियांनी सौम्य रंगाच्या लिपस्टीक्स वापरण्यास परवानगी आहे. तसेच येथील स्त्रिया फक्त स्वदेशी सौदर्य प्रसाधनेच वापरू शकतात.
SL/KA/SL
26 Dec. 2022