दिल्लीत धुक्याचा रेड अलर्ट

 दिल्लीत धुक्याचा रेड अलर्ट

नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभर थंडीची चाहूल सुरु झालेली आहे. नाताळनंतर आता नववर्षाच्या स्वागतासाठी हौशी पर्यटकांची लगबग सुरु झाली आहे. त्यातच दिल्लीत दाट धुक्यामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दाट धुक्यामुळे रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्ग वाहतूक ठप्प झाली आहे. आज सकाळी 7 वाजता दिल्लीतील पालममध्ये 50 मीटरपेक्षा कमी दृश्यमानता होती. दिल्ली विमानतळावर 110 विमानांना उशीर झाला.

उत्तर प्रदेशमध्ये धुक्यामुळे मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सकाळपर्यंत 6 रस्ते अपघात झाले. यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला. तर 41 जण जखमी झाले आहेत. गाझियाबादमध्ये दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवर एक ट्रक उलटला. यानंतर मागून येणारी 25 वाहने एकमेकांना धडकू लागली. क्रेनच्या मदतीने वाहने बाहेर काढण्यात आली.आग्रा-फिरोजाबाद महामार्गावर 15 वाहने एकमेकांवर आदळली. उन्नावमधील आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वेवर कंटेनर आणि स्लीपर बसमध्ये धडक झाली. काही वेळाने दिल्लीकडे जाणाऱ्या दोन स्लीपर बसची पाठीमागून कंटेनर आणि बसची धडक झाली. त्यानंतर दाट धुक्यामुळे यमुना एक्सप्रेसवेवर 12 वाहने एकमेकांवर आदळली.

राजस्थानमध्ये धुक्यामुळे 3 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. तर 8 जण जखमी झाले आहेत. भरतपूरमध्ये बस आणि ऑटोची धडक झाली. यामध्ये एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाला. हनुमानगड येथील अबोहर-सादुलशहर मार्गावर बस आणि जीप यांच्यात झालेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. सीकरमध्ये NH-52 वर दोन कार आणि बसची धडक झाली.

IMD ने मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेशसह 14 राज्यांमध्ये धुक्याबाबत अलर्ट जारी केला आहे. दिल्लीशिवाय पंजाब आणि हरियाणामध्येही रेड अलर्ट आहे. पंजाबच्या अमृतसरमध्ये आज पहाटे साडेपाच वाजता दृश्यमानता शून्यावर पोहोचली.पंजाबला लागून असलेल्या अंबाला, पेहोवा, कैथल, शहााबाद आणि हरियाणातील गुहला येथे सकाळी 8 वाजता 10 ते 50 मीटरपर्यंत दृश्यमानता होती. हवामान खात्यानुसार, हरियाणात 28 डिसेंबरपर्यंत दाट धुके पडण्याची शक्यता आहे. 29 डिसेंबर ते 30 डिसेंबरपर्यंत हलके धुके राहील.

दरम्यान मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये आज सकाळी 200 मीटर दृश्यता होती. भोपाळ, इंदूर, जबलपूर, उज्जैन येथेही धुके दिसून आले. IMD नुसार, मध्य प्रदेशात 30 डिसेंबर ते 4 जानेवारी दरम्यान गारांसह पावसाची शक्यता आहे.

दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, ओडिशा, उत्तराखंड, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये 30 डिसेंबरपर्यंत दाट धुके राहील. येथे दृश्यमानता श्रेणी 50 मीटर पर्यंत असणे अपेक्षित आहे.

खाजगी हवामान एजन्सी स्कायमेटनुसार, तामिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. देशात २९ डिसेंबरपर्यंत हवामान कोरडे राहील. 29 डिसेंबरच्या रात्रीपासून पश्चिम हिमालयात पाऊस आणि हिमवर्षाव सुरू होऊ शकतो.

एकुणच उत्तरभारतात पर्यटनासाठी जाऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांनी हवामान विभागाच्या या अलर्टचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

SL/KA/SL

27 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *