मुंबई बँकेत कॅश रिसायकलिंग मशीन प्रणालीचे झाले उदघाटन
मुंबई, दि २०- मुंबई बँकेच्या ग्राहकांना रांगा न लावता खात्यात रक्कम भरणा करण्यासाठी आणि काढण्यासाठी कॅश रिसायकलिंग मशीन प्रणाली कार्यरत झाली असून या प्रणालीचे उदघाटन भाजपा गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या शुभ हस्ते आज दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर पार पडले. बँकेच्या इतर २८ शाखांमध्ये ही प्रणाली लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे.
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राज्यातील अग्रणीय जिल्हा बँक म्हणून कार्यरत असून ग्राहकांना अत्याधुनिक सेवा देण्याच्या उद्देशाने कॅश रिसायकलिंग मशीन कार्यरत करण्यात आली आहे. कॅश रिसायकलिंग मशीनच्या प्रणालीद्वारे ग्राहकांना त्यांच्या बँकेतील खात्यामध्ये रोख रक्कम भरणे व काढणे सोयीचे होणार आहे. ही सेवा ग्राहकांना २४ तास उपलब्ध होणार असून यामुळे ग्राहकांच्या वेळेची बचत होणार आहे. याप्रसंगी मुंबई बँकेचे कार्यकारी संचालक डी. एस. कदम, मुख्य सरव्यवस्थापक संदीप सुर्वे उपस्थित होते.KK/ML/MS