SBI मध्ये103 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
मुंबई, दि. ३० : देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेत काम करण्याची ही सुवर्णसंधी आहे. SBI स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या भरती अंतर्गत विविध पदांवर नेमणुका करण्यात येणार आहेत, ज्यामध्ये प्रोडक्ट हेड, रिजनल हेड, रिलेशनशिप मॅनेजर, इन्व्हेस्टमेंट ऑफिसर यांसारख्या उच्च पदांचा समावेश आहे.
या प्रक्रियेद्वारे एकूण 103 पदे भरली जाणार आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 25 ते 50 वर्षांच्या दरम्यान असावे. उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि इंटरव्ह्यूच्या आधारे केली जाणार आहे. अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना 750 शुल्क भरावे लागेल, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 27 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2025 आहे. म्हणजेच इच्छुक उमेदवारांकडे अर्ज करण्यासाठी अजून काही दिवसांचा अवधी आहे. उमेदवारांनी अर्ज SBI च्या अधिकृत वेबसाइटवर sbi.co.in/careers या लिंकवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
SL/ML/SL