आधार कार्ड लिंक होताच शालेय शिक्षकांची भरती

 आधार कार्ड लिंक होताच शालेय शिक्षकांची भरती

नागपूर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे आधार कार्ड सरल प्रणालिशी जोडायचे काम सुरू आहे त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक दोन्ही संख्या निश्चित होईल आणि त्यानुसार आवश्यक शिक्षक भरती केली जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत स्पष्ट केलं, सध्या आवश्यक शिक्षकांपैकी पन्नास टक्के भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे असेही त्यांनी सांगितलं, या विषयावरील दोन लक्षवेधी सूचनांवर ते उत्तर देत होते.Recruitment of school teachers as soon as Aadhaar card is linked

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी दरेवाडी इथल्या विद्यार्थ्यांनी केलेलं आंदोलनाबाबत अमित देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केले , तर रायगड जिल्ह्यातील शाळा संच मान्यतेबाबत प्रशांत ठाकूर यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

विद्यार्थ्यांचे आधार लिंक कार्यक्रम ३१डिसेंबर पर्यंत पूर्ण केला जाईल त्यानंतर नेमके विद्यार्थी आणि त्यांना आवश्यक शिक्षक भरती हे निश्चित होऊ शकेल असं केसरकर म्हणाले. शिक्षण हक्क कायद्यानुसार सगळ्यांना शिक्षण दिलं जाईल तसेच वीस पटसंख्या नसलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.

नागपूर च्या कळमना बाजार समितीत आगीने नुकसान झालेल्या मिरची व्यापाऱ्यांना आवश्यक सुविधा देण्याचं , सुसज्ज अग्नी नियंत्रण यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या आणि एक्स्प्रेस फिडर शिवाय साध्या फिडर मधून ही वीज पुरवठा देण्याच्या सूचना संबधित बाजार समितीला दिल्या जातील अशी माहिती पणन विभागाचे प्रभारी मंत्री दादा भुसे यांनी याबाबतच्या लक्षवेधी वर दिली.

ML/KA/PGB
22 Dec .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *