नवोदय विद्यालयात 321 पदांवर भरती
मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): NVS द्वारे भरती अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कंत्राटी पद्धतीने निवड केली जाईल. उमेदवार अधिकृत वेबसाइट navodaya.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. उमेदवारांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जून 2023 निश्चित करण्यात आली आहे. या मोहिमेद्वारे पीजीटी, टीजीटी आणि इतर पदांसाठी भरती केली जाईल.
पदांची संख्या : 321
शैक्षणिक पात्रता
उमेदवारांना मान्यताप्राप्त संस्थेतून 12वी / पदवी / पदव्युत्तर / संबंधित क्षेत्रातील बीएड पदवी आणि कामाचा अनुभव असावा.
धार मर्यादा
उमेदवारांचे कमाल वय ५० वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
निवड प्रक्रिया
या पदांसाठीचे उमेदवार शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर निवडले जातील. त्यानंतर मुलाखतीसाठी बोलावले जाईल. उमेदवारांना त्यांच्या सर्व मूळ कागदपत्रांच्या प्रती पडताळणीसाठी सादर कराव्या लागतील.
पगार
रु. 34,125 ते रु. 35,750 प्रति महिना.
अर्ज कसा करायचा
पायरी 1: अधिकृत वेबसाइट navodaya.gov.in ला भेट द्या.
पायरी 2: मुख्यपृष्ठावर, ‘रिक्रूटमेंट’ टॅबवर क्लिक करा.
पायरी 3: संबंधित रिक्त जागा अधिसूचना लिंकवर क्लिक करा.
पायरी 4: आवश्यक क्रेडेन्शियल्स एंटर करा. आता अर्ज भरण्यास सुरुवात करा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि फी भरा.
पायरी 5: उमेदवार फॉर्म सबमिट करा. फॉर्म डाउनलोड करा. त्याची प्रिंट काढून ठेवा. Recruitment for 321 posts in Navodaya Vidyalaya
ML/KA/PGB
31 May 2023