पाच वर्षांत टोल संकलनात झाली विक्रमी वाढ

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील प्रमुख महामार्गांवर गेल्या पाच वर्षांत विक्रमी टोल वसूल करण्यात आली आहे. सध्या देशात एकूण 1,063 टोल नाके आहेत, त्यापैकी 457 टोल नाके मागील पाच वर्षांत उभारण्यात आले रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील भरथाना टोल नाका सर्वाधिक महसूल जमा करणारा टोल नाका ठरला आहे. सरकारच्या आकडेवारीनुसार, देशातील 10 मोठ्या टोल नाक्यांवर एकूण 13,988 कोटी रुपयांहून अधिक टोल संकलन झाले आहे. हे संकलन 2019-20 ते 2023-24 या कालावधीत झाले असून, त्यामध्ये ग्रँड ट्रंक रोड, दिल्ली-मुंबई महामार्ग आणि पूर्व किनारपट्टी महामार्गावरील टोल नाक्यांचा मोठा वाटा आहे.
वडोदरा-भरूच (NH-48) मार्गावरील या टोल नाक्यावर पाच वर्षांत 2,043.81 कोटी रुपये संकलित झाले.
राजस्थानमधील शहाजहानपूर टोल नाका (गुरगाव-कोटपुतली-जयपूर, NH-48) दुसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे पाच वर्षांत 1,884.46 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.
तिसऱ्या स्थानावर पश्चिम बंगालमधील जलधुलागोरी टोल नाका (धनकुनी-खडगपूर, NH-16) आहे,
चौथ्या उत्तर प्रदेशातील बरजोर टोल नाका (इटावा-चक्केरी, NH-19)
पाचव्या स्थानावर हरियाणातील घरौंदा टोल नाका (पानिपत-जलंधर, NH-44)
SL/ML/SL
25 March 2025