एप्रिल महिन्यात विक्रमी GST संकलन

नवी दिल्ली, दि. २ : एप्रिल २०२३ मध्ये केंद्र सररारने 1.87 लाख कोटी एवढे विक्रमी करसंकलन केले असून या करसंकलनात महाराष्ट्र प्रथम स्थानी आहे. गेल्या वर्षीच्या एप्रिलमध्ये विक्रमी 1.67 लाखांचे जीएसटी संकलन झाले होते.म्हणजेच सरकारने गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी 12% जास्त जीएसटी संकलन केले आहे.
मार्च 2023 मध्ये जीएसटी संकलन 1.60 लाख कोटी होते. एकूण जीएसटीत सीजीएसटी 38,440 कोटी, एसजीएसटी 47,412 कोटी, आयजीएसटी 89,158 कोटी आणि सेस 12,025 कोटी इतके आहे.
जीएसटी संकलनात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात जीएसटी संकलन गेल्या वर्षीच्या तुलनेत 21 टक्के वाढून 33,196 कोटी झाले आहे. तर 14,593 कोटींच्या संकलनासह कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे.
संपूर्ण आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये एकूण 18.10 लाख कोटींचे जीएसटी संकलन झाले आहे.गेल्या वर्षीच्या जीएसटी संकलनापेक्षा या वर्षीचे जीएसटी संकलन 22% जास्त राहिले आहे.
SL/KA/SL
2 May 2023