कडा खरेदी केंद्रात कांद्याला मिळाला विक्रमी भाव
बीड, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मराठवाड्यातील कांदा खरेदी केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला विक्रमी भाव मिळाला. ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या कांद्याला 45 रुपये प्रति किलो दराने मिळालेल्या या भावामुळे शेतकरी खुश झाले आहेत. बीड जिल्ह्यातील कडा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आवक झाली. रविवारी झालेल्या लिलावात 45 रूपये प्रतिकिलो दर मिळाला आहे.
या बाजार समितीतून कांदा थेट दुबई, तामिळनाडू दिल्ली, आंध्र प्रदेश या ठिकाणी कांदा जात असल्याने कडा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. ऐन दिवाळीमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळत असलेल्या या भावामुळे शेतकरी आनंदून गेले आहेत.
ML/ ML/ SL
28 oct 2024