वनमंत्र्यांनी सांगितलं बिबट्यांची संख्या वाढण्याचे कारण
मुंबई, दि. १० :
वनमंत्री गणेश नाईक यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे की, पूर्वी बिबट्या हा वन्यजीव होता. आता तो वन्यजीव नसून उसाचा जीव झाला आहे. म्हणजे उसाच्या शेतात त्यांची पैदास झाली आणि त्यामुळं त्यांची वाढ झाली. बिबट्यांची संख्या वाढली आहे त्याचे कारण म्हणजे उसाचे क्षेत्र वाढले आहे त्यात जन्मलेले बिबट यांची संख्याही वाढली आहे.
पुढे ते म्हणाले की, बिबट्या हा प्राणी शेड्युल एकमध्ये येतो. आता तो शेड्युल 2मध्ये करण्याचा प्रस्ताव आम्ही वनविभागाला पाठवला आहे. वन नसेल तिथे बिबटे आढळत असतील तर त्याची गणना वन्यजीवमध्ये करु नका अशी भूमिका आम्ही घेतली आहे. परंतु, केंद्राच्या वन विभागाकडून बिबट्यांची नसबंदी करण्याची परवानगी मिळाली आहे पण ती फार कमी प्रमाणात आहे.
आजच्या आज रेस्क्यू टीमला पूर्ण आवश्यक आयुध आणि यंत्रणा देण्याचे आदेश देतो. तुम्ही जसे सांगत आहे रेस्क्यू टीम खरोखर उशिरा पोहोचली असेल, तर त्याची माहिती घेतो, भविष्यात रेस्क्यू टीम वेळेत पोहोचेल यासाठी काळजी घेऊ. जखमींचा संपूर्ण उपचार खर्च सरकार करेल.. मजुरांचा रोजगार बिबट दहशतीमुळे बुडत असेल, तर त्या संदर्भात त्यांनाही नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करू, असंही त्यांनी अश्वस्त केले आहे.