पाकिस्तानातील निवडणूक प्रचार रॅलीत खरेखुरे वाघ-सिंह

 पाकिस्तानातील निवडणूक प्रचार रॅलीत खरेखुरे वाघ-सिंह

इस्लामाबाद, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाकिस्तानमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून प्रचाराचा धुराळा उडाला आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या लाहोरमधील निवडणूक प्रचार सभेच चक्क वाघ व सिंह आणल्याचा प्रकार समोर आले आहे. माजी पंतप्रधान नवाज शरीफयांच्या नेतृत्वातील पीएमएलएन पक्ष सत्तेत येण्याची शक्यता वर्तवली जात असून पक्षाकडून अनेक प्रचारसभा, रॅली केल्या जात आहेत. नवाज शरीफ यांच्यासोबतच त्यांची मुलगी मरियम नवाज आणि भाऊ शाहबाज शरीफही प्रचारात सक्रीय आहेत. पाकिस्तानमधील सर्वात ज्येष्ठ राजकीय नेते असलेल्या नवाज शरीफ यांची मंगळवारी लाहोरमध्ये रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीत अशी एक घटना घडली, ज्याची चर्चा पाकिस्तानमध्येच नव्हे तर जगभरात होत आहे. या रॅलीत एक वाघ व सिंह आणण्यात आला होता.

८ फेब्रवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी नवाज शरीफ लाहोरमधील एन-१३० मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. पीएमएलएनचे निवडणूक चिन्ह सिंह आहे तसेच पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवाज शरीफसाठी ‘कौन आया, शेर आया’ घोषणाही खूप लोकप्रिय आहे.

लाहोरमध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची प्रचार सभा होती. या सभेसाठी प्रमुख आकर्षण होते सिंह. नवाज शरीफ आणि मरियम यांच्या प्रचारसभेसाठी पिंजऱ्यात बंद एका खऱ्याखुऱ्या सिंहाला आणले गेले. एका गाडीतून आणलेल्या सिंहाला पाहण्यासाठी लोकांची गर्दी उसळली होती. प्रचारसभेसाठी सिंह आणल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज म्हणजे पीएमएल-एन पक्षाचे निवडणूक चिन्ह सिंह आहे. यातच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खऱ्या खुऱ्या सिंहालाच प्रचारसभेसाठी आणले.

SL/KA/SL

25 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *