वाचन संस्कृती विसरत चाललेल्याना दिले वाचनाचे धडे

 वाचन संस्कृती विसरत चाललेल्याना दिले वाचनाचे धडे

छायाचित्र प्रातिनिधीक

वाशिम, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुस्‍तके अथवा ग्रंथ यांच्‍या सारखा दुसरा गुरु नाही, वाचनाचे महत्व सांगण्यासाठी ‘वाचाल तर वाचाल’ असा संदेशही डॉ.बााबासाहेब आंबेडकर यांनी दिला. मात्र सध्याच्या मोबाईल युगात विशेषतः लहान मुलांना वाचन करायला वेळ मिळत नाही. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून वाशिम जिल्हयातील केकत उमरा येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक डिजिटल शाळेने विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर ठेवत वाचन प्रक्रियेवर भर देण्यासाठी प्रोत्साहीत केले आहे.

याचीच फलश्रुति म्हणून शाळेतील इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या अनुष्का गजानन घोडे या विद्यार्थीनीने चक्क मराठी पाठयपुस्तकातील सर्व धडे तोंडपाठ केले आहेत. पुस्तकातील मजकूर अनुष्काला मुखोद्गद असून इंग्रजी विषयातील पाठांचेही तिचे वाचन सुरू आहे.

दरम्यान, वर्गात शिकवेला घटक नीट समजल्याने आणि घरी तोच मजकूर दोन ते तीन वेळा वाचन केल्याने मराठीतील सर्व धडे अनुष्का सोबतच ईतरही विद्यार्थ्यांच्या पाठ आहेत, मोबाईलच्या विळख्यात न सापडता वर्तमानपत्रे तसेच ईतरही वाचन करण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळोवेळी प्रोत्साहीत केले जाते असे शाळेचे शिक्षक सांगतात.

आजच्या विदयार्थांवरचा अभ्यासाचा ताण आणि विद्यार्थ्यांचे मोबाईलवेड, बिझी शेड्यूल यामुळे वाचन विकास होत नाही मात्र पालकांनी सतत प्रयत्नशील राहून टी.व्ही. मोबाईल मुलांच्या हातात देण्यापूर्वी त्यांना लहानपणापासूनच चित्रमय गोष्टींची पुस्तके हाताळायला देऊन कुतुहल जागृत करण्याचा प्रयत्न शिक्षकांबरोबर पालकांनी सुध्दा केल्यास निश्चितच आजच्या विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीचा विकास होण्यास मदत होईल असे शिक्षक सांगतात.

ML/KA/SL

29 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *