#भारतीय रिझर्व्ह बँक पुढे ढकलू शकते व्याज दर कपातीचा निर्णय

 #भारतीय रिझर्व्ह बँक पुढे ढकलू शकते व्याज दर कपातीचा निर्णय

नवी दिल्ली, दि.19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) शुक्रवारी बाजारात 2 खरब (ट्रिलियन) रुपयांची तरलता (लिक्विडिटी) उपलब्ध करुन दिली. मात्र यादरम्यान केंद्रीय बँकेने फेब्रुवारीच्या पतधोरण आढाव्यामध्ये दर कपातीचे कोणतेही संकेत दिले नाहीत. अशा परिस्थितीत तज्ज्ञांचे म्हणणे आहे की यावेळीही व्याजदरामध्ये कपातीची अपेक्षा कमी आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की किरकोळ महागाई दरात डिसेंबरमध्ये नक्कीच घट झली आहे परंतू सध्या ती चार टक्क्यांच्या वर आहे. डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई 4.59 टक्के होती. सरकारने महागाईचा दर दोन टक्क्यांच्या चढउतारांसह दोन ते चार टक्क्यांच्या मर्यादेत ठेवण्याचे उद्दीष्ट रिझर्व्ह बँकेला दिले आहे. डिसेंबरमध्ये उत्पादित वस्तु स्वस्त झाल्यामुळे महागाई कमी झाली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँक येत्या काही महिन्यांत महागाईत सातत्याने घट पाहिल्यानंतरच दर कमी करण्याचा विचार करेल. याशिवाय आणखी एक संकेतही प्राप्त झाला आहे, ज्यामुळे रिझर्व्ह बँकेकडून दर कमी केले जाण्याची अपेक्षा कमी आहे. रिझर्व्ह बँकेने मागील आठवड्यात रिव्हर्स रेपो दरापेक्षा 0.20 टक्क्यांनी अधिक दराने लिलाव केला आहे. यावरुनही मध्यवर्ती बँक सध्याचे दर कमी करणार नसल्याचा संकेत मिळत आहे.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की आर्थिक स्थैर्यासाठी लवचिकता आणि बळकटी सर्व भागधारकांना संरक्षित करावी लागेल. आम्ही आर्थिक पुनरुज्जीवन आणि वाढीला समर्थन दिले पाहिजे. आपल्याला आर्थिक स्थैर्याचे संरक्षण करावे लागेल. दास यांनी सद्यस्थितीत खरी अर्थव्यवस्था आणि वित्तीय बाजार यांच्यात कुठेतरी समन्वयाचा अभाव आहे, ज्याकडे लक्ष देण्याची गरज आहे यावर जोर दिला होता. त्यांनी सांगितले की बॅड बँकांवर बर्‍याच दिवसांपासून विचार सुरु आहे. रिझर्व्ह बँकेने मालमत्ता पुनर्गठन कंपन्यांसाठी (एआरसी) नियामक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. बॅड बँकेच्या स्थापनेच्या कोणत्याही प्रस्तावावरही विचार करण्यास आम्ही तयार आहोत.
Tag-RBI/Intrest Rate/Shaktikant Das
PL/KA/PL/19 JAN 2021

mmc

Related post