या सहकारी बँकेला RBI ने लावला फक्त २ रू. दंड

 या सहकारी बँकेला RBI ने लावला फक्त २ रू. दंड

नवी दिल्ली, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील बँकांची आर्थिक घडी निट बसावी यासाठी RBI करडी नजर ठेवून असते. आरबीआय ग्राहकांच्या हितासाठी देशातील सर्वच बँकांवर लक्ष ठेवते. नियमांचे उल्लंघन होत असल्याचे लक्षात येताच ताकीद देते. मग दंडात्मक कारवाई करण्यात येते. दरम्यान एका सहकारी RBI ने २ रुपये दंड आकारल्याची माहिती समोर आली आहे. डेहराडून जिल्हा सहकारी बँकेला आरबीआयने केवळ दोन रुपयांचा दंड लावला. नियमांचे उल्लंघन केल्याने ही कारवाई केल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने काही दिवसांपूर्वी सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एसबीआयला 2 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. नियमांचे उल्लंघन केल्याने हा दंड ठोठावण्यात आला होता. त्यावेळी कॅनरा बँक आणि युनियन बँक पण या कारवाईतून सुटली नव्हती.

RBI ने नुकताच राजस्थानमधील राजकोट नागरिक सहकारी बँकेवर (Rajkot Nagarik Sahakari Bank) 43.30 लाखांचा दंड ठोठावला. संचालकांनी त्यांच्याच नातेवाईकांना कर्जाची खिरापत वाटल्याचे समोर आल्यानंतर शिखर बँकेने सहकारी बँकेवर ही कारवाई केली.

SL/ML/SL

19 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *