नियमांचे उल्लंघन केल्यामुळे एचडीएफसी बँकेला दहा कोटी रुपयांचा दंड

 नियमांचे उल्लंघन केल्यामुळे एचडीएफसी बँकेला दहा कोटी रुपयांचा दंड

नवी दिल्ली, दि.29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) खासगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी बँकेला (HDFC Bank ) 10 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. केंद्रीय बँकेने जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे की, बँकिंग नियामक कायद्याच्या कलम 6 (2) आणि कलम आठमधील तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल खासगी क्षेत्रातील या बँकेला हा दंड ठोठावण्यात आला आहे. केंद्रीय बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रिझर्व्ह बँकेने कायद्याअंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खासगी क्षेत्रातील बँकेला हा दंड ठोठावला आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) म्हटले आहे की नियामक अनिवार्यतेचे पालन न केल्याबद्दल ही कारवाई केली गेली आहे. रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले की एचडीएफसी बँकेविरूद्ध (HDFC Bank ) केलेल्या या कारवाईचा ग्राहकांशी बँकेसोबतच्या कराराशी किंवा व्यवहाराशी कोणताही संबंध नाही.

काय आहे संपूर्ण प्रकरण
What is the matter

रिझर्व्ह बँकेने (RBI) जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, बँकेच्या वाहन कर्जाच्या पोर्टफोलिओमधील अनियमिततेबाबत रिझर्व्ह बँकेकडे तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणाच्या चौकशीत रिझर्व्ह बँकेला वर नमूद केलेल्या तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे आढळले. त्यानंतर संबंधित तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल दंड का लावण्यात येऊ नये, अशी विचारणा करत बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.
बँकेच्या कारणे दाखवा नोटीशीवर बँकेकडून प्राप्त झालेले उत्तर, वैयक्तिक सुनावणी दरम्यान तोंडी मांडलेली बाजू आणि बँकेने दिलेले स्पष्टीकरण तसेच सादर केलेली कागदपत्रे यांची तपासणी केल्यानंतर रिझर्व्ह बँकेला (RBI) असे आढळले की बँकेवर लावलेले आरोप योग्य होते. त्यानंतर एचडीएफसी बँकेवर (HDFC Bank ) हा दंड आकारण्यात आला आहे.
The Reserve Bank of India (RBI) has slapped a fine of Rs 10 crore on HDFC Bank, the country’s largest private sector bank. The order issued by the central bank states that the private sector bank has been fined for violating the provisions of Section 6 (2) and Section 8 of the Banking Regulatory Act.
PL/KA/PL/29 MAY 2021

mmc

Related post