RBI ने कर्जवसुली एजंटसाठी लागू केले वेळमर्यादेसह महत्त्वाचे नियम

 RBI ने कर्जवसुली एजंटसाठी लागू केले वेळमर्यादेसह महत्त्वाचे नियम

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बँकांची बँक म्हणून ओळखली जाणारी भारतीय रिझर्व्ह बँक RBI देशातील अन्य बँकाच्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच ग्राहकहीत जोपासण्याकडेही कटाक्षाने लक्ष देते. कर्ज वसुलीसाठी बँक एजंटचे कॉल थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वेळोवेळी कठोर नियम आणत आहे. आरबीआयने प्रस्तावित केलेल्या नियमांनुसार, एखाद्या ग्राहकाने कर्जाचा ईएमआय वेळेवर भरला नाही तरीही, कर्ज वसुली एजंट कर्जदाराला सकाळी 8 वाजण्यापूर्वी आणि संध्याकाळी 7 वाजल्यानंतर कॉल करू शकत नाही.त्याचबरोबर महत्त्वाची कामे आऊटसोर्स करणे, कर्जदारांना धमकावणे यावर अंकुष ठेवण्या प्रयत्नही RBI या नवीन नियमाच्या अंमलबजावणीद्वारे करणार आहे.

आरबीआयने आहे की, वित्तीय संस्थांनी कोणतेही काम आऊटसोर्सिंग केल्यानंतरही त्यांची जबाबदारी संपत नाही. ग्राहकांप्रती ते तितकेच जबाबदार आहेत. यासोबतच या मसुद्यात आरबीआय थेट विक्री एजंट, थेट मार्केटिंग एजंट आणि वसुली एजंटसाठी नियम बनवण्याबाबत सांगितले आहे. हा नियम सार्वजनिक, खाजगी आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्था या तिन्हींना लागू आहे. यासोबतच कर्जाची वसुली करताना रिकव्हरी एजंटना कॉल किंवा मेसेजवर ग्राहकांशी कधी आणि कसा संवाद साधायचा याचे प्रशिक्षण मिळावे, असे आरबीआयने म्हटले आहे.

वसुली एजंट कर्जदारांना धमकावू शकत नाही
ग्राहकांचे हक्क सुनिश्चित करण्यासाठी आरबीआयने वित्तीय संस्थांना त्यांच्या वसुली एजंटना समजावून सांगण्याचे निर्देश दिले आहेत की, ते कर्ज वसुलीसाठी धमक्या किंवा छळ करू शकत नाहीत. यासोबतच वसुली एजंट कर्जदारांचा अपमान करू शकत नाहीत. कर्जवसुलीच्या वेळी कर्जदारांच्या गोपनीयतेचा पूर्णपणे आदर केला पाहिजे हे वित्तीय संस्थांनी लक्षात ठेवावे.

आउटर्सिग टाळा
यासोबतच रिझर्व्ह बँकेने बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या आणि बँकांना केवायसी नियम, कर्ज मंजूरी इत्यादीसारख्या महत्त्वाच्या धोरण व्यवस्थापन कार्यांचे आउटसोर्सिंग टाळण्याचा सल्ला दिला आहे. आरबीआयने आर्थिक सेवांच्या आऊटसोर्सिंगमधील जोखीम आणि आचारसंहिता व्यवस्थापित करण्यावरील त्यांच्या ड्राफ्ट मास्टर डायरेक्शनमध्ये या बाबी सांगितल्या आहेत.

RBI has implemented important rules for debt recovery agents including time limits

SL/KA/SL

27 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *