#भारताच्या जीडीपीची वाढ सकारात्मक होण्याच्या जवळ: रिझर्व्ह बँक

 #भारताच्या जीडीपीची वाढ सकारात्मक होण्याच्या जवळ: रिझर्व्ह बँक

नवी दिल्ली, दि.22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) सकारात्मक विकास दर साध्य करण्याच्या जवळ असल्याचा अंदाज भारतीय रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की व्ही-आकाराच्या सुधारणेतील ‘व्ही’ चा अर्थ लस हा आहे. केंद्रीय बँकेच्या जानेवारीच्या पत्रिकेमध्ये ‘अर्थव्यवस्थेची स्थिती’ यावर एक लेख लिहिण्यात आला आहे, त्याचे शीर्षक आहे “2021 कसे असेल? सुधारणा ‘व्ही-आकाराची’ असेल. व्ही चा अर्थ आहे व्हॅक्सिन म्हणजेच लस. ” हा लेख रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर मायकल देवव्रत पात्रा आणि इतरांनी लिहिला आहे. महत्त्वाचे म्हणजे भारत सरकारने जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम 16 जानेवारीपासून सुरू केला आहे.
या लेखात असे नमूद करण्यात आले आहे की भारताची सर्वात मोठी शक्ती लस उत्पादन क्षमता ही आहे. भारताने याआधी पोलिओ आणि कांजिण्यांसाठी लसीकरण केले आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की जर लसीकरण यशस्वी झाले तर यामुळे धोक्याचे संतुलन वरच्या बाजुला झुकेल. रिझर्व्ह बँकेने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की लेखात व्यक्त केलेली मते मध्यवर्ती बँकेची नसून लेखकांची वैयक्तिक मते आहेत.
लेखानुसार, हंगाम संपण्यापूर्वी, रब्बीचे पेरणीचे क्षेत्र सामान्यपेक्षा जास्त झाले आहे. अशा परिस्थितीत 2021 मध्ये कृषी उत्पादन जास्त होईल. उत्पादनाशी संबंधित (पीएलआय) योजनेअंतर्गत कृषी निर्यात लढाऊ क्षमता दर्शवत आहे. चालू आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 7.7 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता सरकारने वर्तविली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेमध्ये 23.9 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली होती. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत अर्थव्यवस्था 7.5 टक्क्यांनी खाली आली होती.
Tag-RBI/GDP/Near Postive
PL/KA/PL/22 JAN 2021

mmc

Related post