दोन हजाराच्या नोटा बदलण्यास RBI कडून मुदतवाढ
नवी दिल्ली, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नोटाबंदी नंतर मोठ्या उत्साहाने चलनात आणलेल्या २ हजाराच्या नवीन नोटा बंद करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला होता. या नोटा बदलून घेण्याची मुदत आता रिझर्व बँकेने ७ ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढवून दिलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी ७ तारखेपर्यंत रु. २००० च्या नोटा बदलून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर ८ तारखेपासून आरबीआयच्या प्रादेशिक कार्यालयांमध्ये नोटा जमा करता येणार आहेत.
आरबीआयनं १९ मे रोजी घेतलेल्या निर्णयानुसार ३० सप्टेंबरपर्यंत दोन हजारांची नोट बँकेत जमा करण्याची अंतिम मुदत होती. त्यामुळं आता वाढलेल्या ७ दिवसांच्या मुदतीत ज्यांच्याकडे गुलाबी नोटा असतील त्यांनी त्या बँकांमध्ये किंवा आरबीआयच्या प्रादेशिक केंद्रांत जमा कराव्यात.
आरबीआयच्या प्रसिद्धीपत्रकानुसार १९ मे २०२३ रोजी भारतातील चलनात २ हजार रुपयांच्या ३.५६ लाख कोटी रुपयांच्या नोटा होत्या, त्यापैकी २९ सप्टेंबरपर्यंत ३.४२ लाख कोटी रुपयांच्या नोटा जमा झालेल्या आहेत. आता फक्त ०.१४ लाख कोटी रुपयांच्या नोटा जमा व्हायच्या आहेत. एकूण आकडेवारी पाहिली असता १९ मे नंतर २९ सप्टेंबरपर्यंत दोन हजार रुपयांच्या ९६ टक्के नोटा बँकेत जमा झाल्या आहेत.
८ ऑक्टोबरपासून आरबीआयच्या देशभरातील १९ प्रादेशिक कार्यालयांमध्ये एखादा व्यक्ती २ हजार रुपयांच्या २० हजार रुपये रकमेच्या नोटा बदलून घेऊ शकतो. भारतीय पोस्टाद्वारे आरबीआयच्या १९ कार्यालयांकडे या नोटा पाठवता येतील. त्याची रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली जाईल. मात्र यासाठी संबंधित व्यक्ती आणि संस्थांना त्यांच्या ओळखपत्रांचे पुरावे द्यावे लागतील.
ML/KA/SL
30 Sept. 2023