RBI कडून एका वर्षात 12बँकांचा परवाना रद्द

मुंबई, दि. २५ : RBI कडून गेल्या वर्षभरात म्हणजेच जुलै 2024 ते जुलै 2025 या काळात एकूण 12 सहकारी बँकांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. यामध्ये अधिक बँका या शहरांमधील सहकारी बँका आहेत. खराब आर्थिक स्थिती आणि नियमांचं पालन न केल्यामुळं त्या बँकांवर आरबीआयनं कारवाई केली आहे.
आरबीआयनं वर्षभरात परवाना रद्द केलेल्या बँका
- बनारस मर्केंटाइल सहकारी बँक वाराणसी, उत्तर प्रदेश (जुलै 2024)
- सिटी को-ऑपरेटिव्ह बँक मुंबई, महाराष्ट्र 2024
- पूर्वांचल सहकरी बँक गाझीपूर, उत्तर प्रदेश 2024
- सुमेरपूर मर्केंटाइल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक राजस्थान 2024
- जय प्रकाश नारायण नागरी सहकारी बँक बिहार 2024
6 श्री महालक्ष्मी मर्केंटाइल को ऑपरेटिव्ह बँक तामिळनाडू 2024
- हिरियूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक कर्नाटक 2024
- अंजना अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक औरंगाबाद, महाराष्ट्र 22 एप्रिल 2025
- कलर मर्चेंटस को ऑपरेटिव्ह अहमदाबाद, गुजरात 16 एप्रिल 2025
- इंपीरियल अर्बन को ऑपरेटिव्ह बँक जालंधर, पंजाब 25 एप्रिल 2025
- शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक अकलूज, महाराष्ट्र 11 एप्रिल 2025
12 . कारवार अर्बन को ऑपरेटिव्ह बँक कारवार, कर्नाटक 22 जुलै 2025
कारवाईची कारणे
रिझर्व्ह बँकेनं ज्या बँकांवर कारवाई केली त्यांच्याकडे पुरेसे भांडवल नव्हतं. भविष्यात आर्थिक कमाई करण्यात त्या बँका असमर्थ होत्या. आरबीआयच्या मते या बँका सुरु ठेवल्यास ठेवीदारांसाठी नुकसान करणाऱ्या ठरल्या असत्या. कारण त्या त्या ठेवीदारांचे पैसे देऊ शकत नव्हत्या.काही बँकांकडून केवायसी सारख्या नियमांचं पालन केलं जात नव्हतं. बँकेनं दिलेल्या वेळेत ते काम होतं होतं. ज्यामुळं आरबीआयनं दंड देखील केला होता.
SL/ML/SL