रवींद्र चव्हाण यांनी दिल्लीत घेतली नेत्यांची भेट

नवी दिल्ली दि ८ — महाराष्ट्र भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य मंत्री व भाजपा परिवाराचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जगत प्रकाश नड्डाजी यांची स्नेहभेट घेतली. या भेटीमध्ये महाराष्ट्रातील पक्ष संघटना आणखी बळकट करण्यासोबतच विविध विषयांवर चर्चा झाली.

तसेच रविंद्र चव्हाण यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही सदिच्छा भेट घेतली. ML/ML/MS