साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रविंद्र शोभणे

 साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रविंद्र शोभणे

पुणे , दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अमळनेर येथे होणार्‍या ९७ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली आहे. २०२४ मध्ये २ ते ४ फेब्रुवारी या कालावधीत हे संमेलन पार पडेल. संमेलनाच्या आयोजन करणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी आज ही घोषणा केली.Ravindra Sobhane as the President of Sahitya Samelan

पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेत महामंडळाच्या सर्व घटक आणि संलग्न संस्थांची बैठक पार पडली. या बैठकीत संमेलनाध्यक्षांच्या नावासह संमेलनाच्या तारखा आणि कार्यक्रम पत्रिकेवर देखील चर्चा झाली. यावेळी महामंडळाच्या कार्यवाह उज्ज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, उपाध्यक्ष रमेश वंसकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आदी उपस्थित होते

ML/KA/PGB
25 Jun 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *