जिंकलेल्या सामन्यात रविंद्र जडेजाला ठोठावला दंड
नागपूर, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारताने आज ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या सामन्यात तब्बल एक डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवला तरी रवींद्र जडेजाला आयसीसीच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे.
भारताने नागपूर येथील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा अवघ्या अडीच दिवसात पराभव केला. रोहित शर्माच्या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन संघाला एक डाव आणि 132 अशा मोठ्या फरकाने पराभूत करून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
यातील स्टार अष्टपैलू खेळाडू जडेजाला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले .
दंड नेमका का
मात्र ICC आचारसंहितेच्या लेव्हल 1 चे उल्लंघन केल्याबद्दल रवींद्र जडेजाला त्याच्या मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. त्याने खेळाडू आणि खेळाडू सपोर्ट कर्मचार्यांसाठीच्या ICC आचारसंहितेच्या कलम 2.20 चे उल्लंघन केल्याचे आढळून आले. हे खेळाच्या विरुद्ध असलेले आचरण प्रदर्शित करण्याशी संबंधित आहे.
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीच्या पहिल्या डावात ही घटना घडली कारण जडेजा त्याच्या बोटाला क्रीम लावताना दिसला. जडेजाने मोहम्मद सिराजच्या तळहातातील क्रिमसदृष पदार्थ घेतला आणि तो डाव्या हाताच्या तर्जनीला चोळताना दिसला हा नियमभंग आहे.Ravindra Jadeja was penalized in the winning match
ML/KA/PGB
11 Feb. 2023