वैचारिक सुंता झालेल्या संजय राऊत यांनी छत्रपतींचं नाव घेऊ नये
मुंबई दि ७ — औरंगजेब फॅन क्लबचे प्रवक्ते आणि ज्यांची वैचारिक सुंता झाली असे संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊ नये, असा जोरदार हल्ला नवनाथ बन यांनी चढवला आहे.
नवनाथ बन म्हणाले की, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालतो. संघाच्या प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करूनच केली जाते. डॉ. हेडगेवार यांनीही सांगितलं होतं की व्यक्ती म्हणून आदर्श मानायचा असेल तर फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच माना. त्यामुळे महाराजांचे नाव घेण्याचा आणि संघाला सल्ला देण्याचा अधिकार संजय राऊत यांना नाही.”
ते पुढे म्हणाले की, “राऊत हे नक्षली आणि फॅसिस्ट विचारांचे आहेत, त्यांची वैचारिक सुंता झालेली आहे हे वारंवार सिद्ध झालं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर आमचं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं प्रगाढ प्रेम आहे. देवाभाऊ महाराजांच्या विचारांवर राज्यकारभार चालवत आहेत, तर संजय राऊत यांनी खंडणीखोरीवर राज्यकारभार चालवला आहे, हे महाराष्ट्राने पाहिलं आहे.”
बन यांनी ठामपणे सांगितलं की, “महाराजांबद्दल आमचं प्रेम खरं आहे आणि तुमचं बेगडी आहे, हे जनता जाणून आहे. विधानसभा निवडणुकीत जनतेने तुम्हाला घरी बसवलं आहे. आम्ही आजही छत्रपतींचं नाव गर्वाने घेतो आणि घेत राहणार आहोत. संजय राऊत यांनी याबद्दल बोलू नये.” असा टोला नवनाथ बन यांनी लगावला आहे.ML/ML/MS