रतन टाटांनी साजरा केला आवडत्या कारचा वाढदिवस
मुंबई,दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उद्योगपती रतन टाटा यांनी देशातील पहिल्या स्वदेशी कार इंडिकाचा (Indica) वाढदिवस साजरा केला. ही कार बाजारात आली, त्यावेळी ती ग्राहकांच्या पसंतीस उतरली. या कारने शहरीभागासोबतच ग्रामीण भागातही जोरदार विक्री केली. पॅसेंजर कार सेगमेंटमध्ये या कारने ग्राहकांची सर्वांधिक पसंती मिळवली होती. भारतीयांच्या मनावर कधी काळी या कारचे गारुड होते. ही कार शहरी आणि ग्रामीण संस्कृतीत अगदी योग्य अशीच होती. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत, इंडिकासोबत तरुण रतन टाटा यांचा फोटो बघता येईल. या फोटोचे रतन टाटा यांनी कॅप्शन दिले आहे.
“ 25 वर्षांपूर्वी टाटा इंडिका लॉन्च करून भारतातील स्वदेशी प्रवासी कार उद्योगाची सुरुवात झाली. या आठवणी माझ्या मनात घर करुन आहेत.” टाटांच्या पोस्टला पोस्टला 2 दिवसात 4 दशलक्षाहून अधिक लाईक्स आणि 20,000 हून अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत.
इंडिकाच्या रुपाने केवळ व्यावसायिक वाहनं तयार करणाऱ्या टाटा मोटर्सने पहिल्यांदा प्रवासी वाहन तयार केलं होतं. टाटा मोटर्सने पहिल्यांदा 1998 मध्ये इंडिका भारतीय बाजारात सादर केली होती.
SL/KA/SL
19 Jan. 2023