रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची नियुक्ती

 रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची नियुक्ती

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :ज्येष्ठ उद्योगपती व टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनानंतर ११ ऑक्टोबर रोजी टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदाची जाबाबदारी नोएल टाटा यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. रतन टाटांच्या निधनानंतर मुंबईत टाटा समुहाची एक महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत सर्व वरिष्ठ अधिकारी व विश्वस्तांच्या सहमतीने रतन टाटांचे भाऊ नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टचे नवे चेअरमन म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. नोएल टाटा यांचे नाव टाटा समूहाचे वारसदार म्हणून आघाडीवर होतं. नोएल हे सध्या ट्रेंट लिमिटेड आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष, टाटा इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक, टाटा स्टील आणि टायटन कंपनीचे उपाध्यक्ष आहेत. टाटा समुहाच्या दोन सर्वात मोठ्या धर्मादाय संस्था सर रतन टाटा ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्ट यांच्या प्रमुखपदी आता नोएल टाटांची नियुक्ती करण्यात आली आहे. नोएल टाटा हे याआधी या दोन्ही संस्थांचे विश्वस्त म्हणून कार्यरत होते.आता ते या संस्थांचा कारभार पाहणार आहेत

ML/ML/PGB
11 Oct 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *