‘रसना’च्या संस्थापकाचे निधन
मुंबई,दि.21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रसना कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष अरिज पिरोदशॉ खंबाटा (85) निधन झाल्याचे वृत्त कंपनीने प्रसिद्ध केले आहे. सत्तरच्या दशकात महागड्या शीतपेयांना पर्याय म्हणून स्वस्तात मस्त अशा घरी तयार करता येणाऱ्या रसना शीतपेयाचा भारतीय बाजारपेठेत प्रवेश झाला. Rasana-founder-areez-khambatta-no-more
लहान मुलांमध्ये विशेष लोकप्रिय असलेल्या या शीतपेयाची I Love U Rasana ही जाहीरातही आवडीने पाहिली जात असे. आज बाजारात अनेक पर्याय उपलब्ध असूनही भारतीयांना रसनाने घातलेली भुरळ कायम राहीली. अनेकांच्या लहानपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीतील आठवणी रसनाशी जोडल्या गेल्या आहेत.
आजही देशातील १८ लाख रिटेल आउटलेटवर त्याची विक्री होते. रसना ही आता जगातील सर्वात मोठी शीतपेय उत्पादक कंपनी आहे. रसना या ब्रॅण्डचे शीतपेय जगभरातील ६० देशांमध्ये विकले जाते.
21Nov. 2022